आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंवर 206 कोटींच्या नियमबाह्य खरेदीचा आरोप, घाई नेमकी कशासाठी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- पंकजा मुंडे... - Divya Marathi
फाईल फोटो- पंकजा मुंडे...
मुंबई- राज्याच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतेलल्या एका निर्णयामुळे त्या वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण खात्याने 13 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी 206 कोटी रूपयांच्या वस्तू व साहित्याची खरेदी केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी या घटनेला पंकजा मुंडेंसह मुख्यमंत्री फडणवीसांना जबाबदार धरले आहे.

तीन लाखांपेक्षा जास्तीच्या खरेदीसाठी ई-टेंडरिंग काढण्याचा शासन निर्णय असतानाही पंकजा मुंडेंनी तो धाब्यावर एकाच दिवशी तब्बल 24 जीआर काढत खरेदीचे आदेश दिले होते. ही खरेदी करताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचेही दिसून येत आहे. एकाच दिवशी 24 जीआर काढून खरेदीची घाई नेमकी कशासाठी असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबतचे वृत्त आज एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पंकजा मुंडे यांच्या खात्याने चिक्की, चटई, डिशेस, वह्या-पुस्तके आणि वॉटर फिल्टर अशी वस्तू व साहित्य खरेदीत नियमाचे उल्लंघन केले आहे. तसेच पंकजा यांनी ठरलेल्या किंमतीपेक्षा अधिक किेंमती वाढवून दिल्या आहेत. या सरकारी नियमाचे उल्लंघन झाले आहे. ई-टेडरिंगचा पर्याय वापरला नाही व ज्या संस्थांना ही कामे दिली आहेत ती वशीलेबाजीने दिल्याची शक्यता दिसत आहे.
यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले असून, महिला व बालकल्याण खात्यातंर्गत केलेली खरेदी ही केंद्र सरकारच्या नियमानुसारच केली आहे. खरेदी केलेले पदार्थ, वस्तू, साहित्यांबाबत अधिकृत दर उपलब्ध असल्याने ई-टेडरिंग करण्याचा प्रश्नच उद्धभवला नाही. सर्व कंत्राटे ही मान्यताप्राप्त असलेल्या संस्थांनाच दिलेली आहेत अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
पंकजा मुंडेंनी घेतलेले निर्णय व त्यावर नोंदवलेले आक्षेप
- नवी मुंबईच्या जगतगुरु कंपनीकडून 5 कोटी 60 लाख रूपयांच्या वह्या-पुस्तकांची खरेदी करण्यात. मात्र, या कंपनीच्या नावे चेक न काढता तो भानुदास टेकवडे यांच्या खात्यावर वटविण्यात आला.
- बालकल्याण खात्याच्या नाशिकच्या आयुक्त विनिता सिंघल यांनी नाशिकच्या एव्हरेस्ट कंपनीकडून एक फिल्टर 4 हजार 500 रूपयांना खरेदी करण्यास परवानगी दिली होती. मात्र, पंकजा यांनी मंत्रीमहोदय या नात्याने ती किंमत 5 हजार 200 रपयेपर्यंत वाढविली. विशेष म्हणजे एव्हरेस्ट कंपनीचे स्वत:चे उत्पादन युनिट नसतानाही बेकायदेशीर मेहेरबानी केल्याचा आक्षेप आहे.
- आदिवासी विद्यार्थ्यांना वाटली जाणारी चिक्की पुरवठ्याचे कंत्राट देताना पंकजा मुंडेंनी वशेलीबाजी केल्याचे दिसून येत आहे. सिंधूदुर्गमधील सुर्यकांता सहकारी महिला संस्थेने 37 कोटी रूपयांचे कंत्राट मागितले होते. त्याला केंद्रीय खरेदी आयुक्त राधिका रस्तोगी यांनी आक्षेप नोंदवत ई-टेडरिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पंकजा मुंडेंनी या निर्णयात हस्तक्षेप करून सुर्यकांता महिला संस्थेलाच तब्बल 80 कोटींचे कंत्राट दिले. विशेष म्हणजे एव्हरेस्ट कंपनीप्रमाणेच या महिला संस्थेकडे चिक्की बनविण्याचा कोणताही प्रकल्प नाही.
- आदिवासी भागात महिलांना जे वैद्यकीय कीट दिले जाते त्या कीटच्या खरेदीसाठी 500 कोटींची तरतूद सरकारने केली आहे. पण कंत्राटदाराने 720 रूपये किेंमत लावली. कंत्राटदाराची ही मागणी मान्य करीत पंकजा मुंडे यांनी हे कीट 500 रूपयांतच बसविण्यास सांगत त्यातील औषधांची संख्या कमी करण्यास परवानगी दिली. ज्यामुळे कंत्राटदाराने कमी औषधे देऊन प्रति कीट 500 रूपये पदरात पाडून घेतले.
- कुपोषित मुलांचे मॉनिटरिंग करण्याची मशिन्स खरेदी करण्यासाठी मुंडेंनी 24 कोटींची परवानगी दिली. यातील साई हायटेक कंपनीला 6 कोटी तर नितीराज इंजिनिअर्सला 18 कोटी रूपये दिल्याचे उघडकीस आले आहे. यात अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम मोजली गेल्याचे स्पष्ट होत आहे.
पुढे पाहा, पंकजा मुंडे यांच्याबाबत सोशल मिडियात आलेल्या निवडक प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...