आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तूंचे दर वाढवले नाहीत, सर्व खरेदी नियमानुसारच; महिला व बालकल्याणकडून स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘महिला व बालकल्याण विभागात खरेदी करताना वस्तूंच्या किमती वाढवून देण्यात आल्या, हा आरोप धादांत खोटा आहे. या खात्याप्रमाणेच आदिवासी, वैद्यकीय, सामाजिक न्याय, आरोग्य इत्यादी िवभागांतही जेथे ई-टेंडरिंगची गरज नसते तेथे अधिकृत दरानेच खरेदी केली जाते’, असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण खात्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांनी दिले आहे.

या खात्यात २०६ काेटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. त्याची खातरजमा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या खात्याच्या प्रधान सचिवांना एक पत्र पाठवून अभिप्राय मागवला होता. त्यानुसार संजयकुमार यांनी बाजू मांडली. "आरोपाच्या प्रत्येक प्रश्नाला आमच्या विभागाचे उत्तर तयार आहे. ते लवकरच दिले जाईल. मात्र, सध्या जे काही आरोपांचे रान उठवण्यात आले आहे, ते धादांत खोटे आहे. मुख्य म्हणजे पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून वस्तूंचे दर वाढवण्यात आले यात कुठेही सत्यता दिसत नाही', असे संजयकुमार म्हणाले.

धुळ्यात बारा काेटींचे कंत्राट
मंत्री पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण विभागाने कुपाेषित बालकांचे वजन करण्यासाठी इपीजीएम (इलेक्ट्रानिक फिजिआेग्राफ माॅनियरिंग) वजनकाटे धुळे येथील नीतिराज इंजिनिअरिंग कंपनीकडून खरेदी केले हाेते. हे साडेबारा काेटी रुपयांचे कंत्राट हाेते. राजेश भतवाल यांच्या मालकीची ही कंपनी आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लखन भतवाल यांचे राजेश हे पुतणे आहेत. नीतिराज कंपनी गेल्या नऊ वर्षांपासून अशा प्रकारचे इपीजीएम यंत्रे पुरवत आहे. निविदा निघाल्यानंतर सरकारने ठरवून दिलेले निकष व दरानुसार ही यंत्रे पुरवण्यात आल्याचे राजेश भतवाल यांनी सांगितले.

ताट खरेदीचे ‘नागपूर कनेक्शन’ !
महिला व बालविकास खात्यातील कथित घोटाळ्याची तार नागपूरपर्यंत जुळवली जात आहे. सुमारे ९.२४ कोटी रुपये किमतीच्या ताटांची खरेदी नागपुरातील वैद्य इंडस्ट्रीजकडून करण्यात आली असून या उद्योगाचे मालक विवेक वैद्य यांचे भाजप आणि संघ परिवाराशी संबंध आहेत. स्वत: वैद्य यांनी हे संबंध कबूल करतात मात्र या संबंधाचा कंत्राट मिळवण्यासाठी कधीच वापर केला नसल्याचे ते सांगतात. ‘दरकरारानुसार ताटांचा पुरवठा झाला असून त्यात कुठलाही घोटाळा झालेला नाही. ताटाची मूळ किंमत ९३ रुपये आहे. त्यात व्हॅट, सेवाकर धरून १०७ रुपये आकारण्यात आले. खरेदीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही पुरवठ्याची तयारी दर्शवली होती’, असा दावा वैद्य यांनी केला.

(फोटो : दाेनशे काेटींचा घाेटाळा झाल्याचा आराेप करत महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील वरळीच्या सुखदा निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी निदर्शने केली. छाया : संदीप महाकाल)
बातम्या आणखी आहेत...