आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde, Eknath Khadse And Nitesh Rane Marathwada Visit

मुंडे, खडसे, राणे मराठवाड्याच्या दुष्काळी दौर्‍यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठवाड्यातील दुष्काळाने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. शिवसेना नेत्यांच्या दौऱ्यानंतर महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे २१ नोव्हेंबरपासून तीन दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसचे आमदार नितेश राणेही २४ नोव्हेंबरपासून या भागाचा मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांना राणे भेट देणार असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचीही ते भेट घेणार आहेत. शेतकरी अवकाळी पाऊस, गारपिटीने त्रस्त आहे. पिकांचे नुकसान व डोक्यावर वाढता कर्जाचा डोंगर सहन न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती भीषण असून शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा दौरा आखण्यात आला असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.