आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तायक्वांदोचे डावपेच लढवणाऱ्या पंकजा मुंडेंना ‘ब्लॅक बेल्ट’; मुलानेही पटकावले सुवर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राजकीय आखाड्यात डावपेच आखत विरोधक आणि पक्षातंर्गत स्पर्धकांना ‘चितपट’ करणाऱ्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या तायक्वांदो स्पर्धेच्या निमित्ताने मैदानात उतरून काेरियन खेळाडूंवर काही डावपेच टाकले. तसेच त्यांचे पूत्र अार्यमननेही या स्पर्धेत सहभागी हाेऊन ७३ किलाे वजन गटात सुवर्णपदक पटकावले. मात्र यानिमित्ताने सर्वाधिक चर्चा झाली ती पंकजांच्या तायक्वांदो सरावाची झाली. त्यांचा हा उत्साह पाहून आयोजकांनी पंकजा यांचा मानद ‘ब्लॅक बेल्ट’ देऊन त्यांचा गाैरवही केला.


रिपब्लिक ऑफ कोरियातील मुंबई दुतावास कार्यालयातर्फे नुकतेच तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत कोरियन तायक्वांदोपटूंनी श्वास रोखून धरणारी प्रात्यक्षिके सादर केली. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे प्रमुख पाहूण्या हाेत्या. त्यांनी स्पर्धकांचे काैतुक करत कोरियन खेळाडूंसोबत काही डावपेच लढवले. स्पर्धेनंतर पंकजांच्या हस्ते विजेत्या खेडाळूंना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. माय-लेकाचे कौतुक पाहण्यासाठी पंकजांचे पती अमित पालवे, बहिण खासदार प्रीतम मुंडेे यांची उपस्थिती होती. 


मुलाने जपली आईची आवड

भाजपचे ज्येष्ठ नेते गाेपीनाथ मुंडे यांची वारसदार असलेल्या पंकजांनी अाजवर सभांची अनेक मैदाने मारली अाहेत. विधिमंडळातही त्या विराेधकांच्या प्रश्नांना चाेख उत्तर देत असतात.  मात्र  तायक्वांदो स्पर्धेच्या निमित्ताने सरावासाठी कोर्टवर उतरल्यानंतर क्रीडा क्षेत्रातील त्यांची आवड पहिल्यांदाच सर्वांसमोर आली. पूत्र आर्यमननेही अाईची ही  अावड यशस्वीपणे जपल्याची चर्चा उपस्थितांमध्ये हाेती.

बातम्या आणखी आहेत...