आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे-भुजबळ भेटीने चर्चेला उधाण, OBC एकजुुट की भाजप प्रवेशाचा अजेंडा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना संधी साधत महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची बुधवारी जे. जे. रुग्णालयात भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. ही चर्चा निमित्त ठरून राज्यात ओबीसी एकजुटीची चर्चा सुरू झाली आहे. तर छगन भुजबळ भाजपमध्ये जाण्याची चर्चाही सुरु झाली आहे.

येत्या काही दिवसांत ओबीसी संघटनांक़डून भुजबळांना जामीन मिळावा या मागणीसाठी नाशिकला मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला पंकजा यांच्या माध्यमातून बळ मिळण्याची शक्यता आहे. भुजबळ बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात असून त्यांची प्रकृती बिघडल्याने सध्या त्यांना जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंकजा यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून भुजबळांच्या प्रकृतीची माहिती घेतली. ओबीसी प्रश्नावरून एकेकाळी दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ एकत्र आले होते. शिवाय भुजबळ हे आमचे नेते असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ओबीसींच्या नेत्या म्हणून पंकजा भुजबळांच्या मागे पडद्याआडून खंबीर पणे उभ्या राहू शकतात, अशीही जोरदार चर्चा आहे.
राज्यात ओबीसींची संख्या मराठा समाजानंतर मोठी असून एकेकाळी या समाजाला भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातून एकत्र अाणून आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भुजबळ आपली राजकीय ताकद वाढवत आहेत, हे लक्षात येताच पवारांनी त्यांना लगाम घातला.
पुढे वाचा...
> भुजबळांची कमी झालेली राजकीय ताकद आणि सध्या सहन करावा लागत असलेला तुरुंगवास...
बातम्या आणखी आहेत...