आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणात जातीयतेमुळे दुर्दैवी परिस्थिती : मुंडेे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड - जन्मापासून राजकारण पाहिले आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्याबरोबरच अनेक नेत्यांचे राजकारण मी जवळून पाहिले आहे. मात्र, त्या काळची परिस्थिती ही वेगळी होती आताची परिस्थिती ही वेगळी असून, सध्या राजकारणात सर्वात दुर्दैवी परिस्थिती आहे. कुठेही गेेले की जातीचे नाव घेऊन बोलावे लागते. नाही तर लोकांना राग येतो. हे सर्व चुकीचे असून ही परिस्थिती पाहून दु:ख वाटत असल्याचे प्रतिपादन मंत्री पंकजा मंुडेे यांनी अंबड येथे अायोजित सभेप्रसंगी केले.

या वेळी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलास खरात, डॉ.भागवत कराड आदींची उपस्थिती होती. अंबड येथे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेे या आल्या होत्या. या वेळी त्या म्हणाल्या की, मुंडे साहेबांनी मला स्टार केले. त्यामुळे मी आज निवडणुकीत स्टार प्रचारक आहे. त्यांनी मला स्टार केले नसते तर आज मी लोकप्रिय झाले नसते.
बातम्या आणखी आहेत...