आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांना पंकजा मुंडेंची सर्वाधिक दांडी, ३३ % बैठकांना गैरहजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी हजर राहावे असे सांगितले होते. तरीही अनेक मंत्री मंत्रिमंडळ बैठकांना दांडी मारतात. आतापर्यंत झालेल्या बैठकांना सगळ्यात जास्त वेळा महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे गैरहजर असून दांडी मारण्यात त्यांचा पहिला क्रमांक लागतो. अन्य दांडीबहाद्दर मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत, सुधीर मुनगंटीवार आणि राजकुमार बडोले यांचा क्रमांक आहे.

मुख्य सचिव कार्यालयाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी नि. भा. खेडेकर यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार ११ डिसेंबर २०१४ ते जून २०१५ पर्यंत मंत्रिमंडळाच्या एकूण २८ बैठका झाल्या. मुख्यमंत्री आणि अन्य १७ मंत्र्यापैकी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर सर्व बैठकांना उपस्थित राहिले असून १६ मंत्र्यांनी दांड्या मारलेल्या आहेत.

पुढे वाचा, महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे या २८ पैकी नऊ वेळा अनुपस्थित....