आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजा मुंडेंचा केंद्रात जाण्याचा निर्णय, लवकरच मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: माजलगाव जि. बीड येथील जायकवाडी धरणात मासेमारी करणा-या मजुरावर ठेकेदाराने केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मजुरांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे गा-हाणे ऐकले व पाठिंबा दिला.)
मुंबई- केंद्रात जावे की राज्यात रहावे याबाबत संभ्रमित असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी अखेर केंद्रात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मोदी मंत्रिमंडळाचा या महिन्यात विस्तार होणार आहे यात पंकजाला स्थान मिळणार असल्याचे संकेत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी पंकजाला दिले. त्यानंतर पंकजानी राज्यात न थांबता दिल्लीत जाण्याचा निर्णय पक्का केला आहे.
पंकजा मुंडे शुक्रवारी आपल्या बीड जिल्ह्याच्या दौ-यावर होत्या. त्यावेळी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच आपण केंद्रात जावे अशी राज्यासह दिल्लीतील नेत्यांची इच्छा असल्याचे सांगितले. पंकजा या गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार ठरू शकतात तसेच त्यांच्याच नेतृत्वाचे गुण असल्याचे दिसून आले आहे. बहुजन समाज भाजपमागे कायम ठेवायचा असल्यास पंकजाला महत्त्वाचे स्थान द्यावे लागेल असे भाजपमधील धुरिणींना वाटत आहे. राज्यातील मुंडे समर्थकांनीही पंकजांना केंद्रात मंत्रिपद द्यावे अशी जोरदार मागणी केली होती. त्यामुळेच पंकजाला राज्यात न ठेवता दिल्लीत पाठवावे असे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.
दुसरीकडे, मुंडे यांच्या घरातील कोणी सदस्य पोटनिवडणुकीस उभा राहिल्यास तेथे उमेदवार देणार नसल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पंकजा लोकसभेवर बिनविरोध निवडून जातील अशी शक्यता आहे. मोदी सरकारला सत्तेत येऊन अडीच महिने झाले आहेत. सरकार स्थापनेवेळी मोदींच्या मंत्रिमंडळात 40-45 जणांचा फक्त समावेश केला होता. त्यामुळे अनेक मंत्र्यांकडे दोन-दोन खात्यांचा पदभार देण्यात आला आहे.
मोदी सरकार आता स्थिर झाले असून, कामाला लागले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मोदींचा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मनोदय आहे. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागी महाराष्ट्रातून कोणाला संधी द्यायची याचा विचारविनिमय पक्षात सुरू आहे. सध्या मुंडे यांच्या ग्रामीणविकास खात्याची जबाबदारी गडकरी यांच्याकडे तात्पुरती सोपविण्यात आली आहे. मुंडे यांच्या निधनाने पक्षाचा बहुजन चेहरा हरपला आहे. या समाज कायम पक्षासोबत रहावा यासाठी पंकजाला मानाचे स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे या पंधरवड्यात होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात मुंडे यांच्या कन्या पंकजा यांच्याकडे स्वतंत्र पदभार असलेल्या खात्याचे राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. हे कोणते असावे याचा सर्वस्वी निर्णय मोदी घेणार आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. यासाठी पंकजासह राज्यातील बडे नेते दिल्लीत आहेत. भाजपचे नवे अध्यक्ष अमित शहा यांनी ख-या अर्थाने आजपासून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे घेतली. ते लवकरच आपली पक्षसंघटनेची नवी टीम जाहीर करणार आहेत. यात महाराष्ट्रातून सुधीर मुनगंटीवर यांना महासचिवपद मिळण्याची शक्यता आहे. पंकजा यांनाही मंत्रिपदासह पक्षसंघटनेत स्थान दिले जाणार आहे.
पुढे वाचा, पंकजाला महाराष्ट्रात राहण्यास रस पण...