आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde Press Conference At Mumbai Over Chikki Alligations

पंकजा मुंडे भाजपात एकाकीच! चिक्की प्रकरणी सर्व आरोप पुन्हा फेटाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चिक्की व इतर साहित्य खरेदीत एक रूपयाचाही गैरव्यवहार झालेला नाही. तसेच त्याची खरेदी करतानाही कोणताही नियम मोडला नाही. हे आरोप राजतकीय प्रेरित असून, विरोधकांनी मी परदेशात गेल्यानंतर आरोप केले. यामागे माझ्या बदनामीचा कट आहे असे महिला व बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत सांगितले.
राज्यातील आदिवासी भागातील मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून वाटण्यात येणा-या चिक्की व इतर काही साहित्य खरेदीच्या 206 कोटींच्या कंत्राटात पंकजा मुंडेंनी नियम धाब्यावर बसविले असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. विरोधकांनी यावरून रान पेटवले. पंकजा मुंडे युरोपात फिरायला गेल्या असताना हा आरोप करण्यात आला. मागील आठ दिवस हे प्रकरण राज्यात, देशात चर्चेले जात आहे. परदेशात असताना पंकजांनी आपल्या आरोपवरील वारंवार खंडन केले. मात्र, चर्चा होतच राहिली.
मंगळवारी पहाटे पंकजा लंडनहून मुंबईत परतल्या. त्यानंतर आज दुपारी त्यांनी पत्रकरा परिषद घेऊन पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे या एकट्याच दिसून आल्या. त्यांच्यासमवेत महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, बहिण खासदार प्रीतम मुंडे व रासपचे आमदार महादेव जानकर आदीच उपस्थित होते. पत्रकार परिषद संपत असताना प्रकाश मेहता हे तेथे आले. मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी भाजपमधील दोन वरिष्ठ मंत्री धावले व त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले.
मात्र, मागील आठ दिवसापासून मुख्यमंत्री वगळता भाजपमधील एका मंत्र्यांने पंकजांची पाठराखण करताना दिसले नाहीत. आजही तोच प्रत्यय आला. त्यामुळे तावडेंच्या बचावासाठी भाजपाची एकी दिसून आली तर पंकजा या एकाचीच असल्याचे स्पष्ट झाले. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारला अजून वर्षही झाले नाही तोच पक्षात गटबाजीचे राजकारण सुरु झाल्याचे चित्र आहे.

काय काय म्हणाल्या पंकजा मुंडे....
- चिक्की प्रकरणात कोणताही घोटाळा नाही, हा तर केवळ शब्दांचाच घोटाळा...
- कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असून, एकही रुपयांचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्यास सर्व पदांचा राजीनामा देऊ...
- नवीन साहित्य, वस्तूंची खरेदी केली जाते, त्यावेळीच ई-टेंडरिंग करायचा राज्य सरकारचा निर्णय आहे. चिक्कीचे कंत्राट नव्याने दिले नाही, ते जुनेच आहे.
- ई-टेंडरिंग न करता आघाडी सरकारने 408 कोटींची खरेदी केली आहे. त्याच ठेकेदारांना उर्वरित कंत्राट दिले आहे.
- चिक्की आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी मी कोणत्याही नवीन पुरवठादाराला या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले नाही.
- चिक्कीचा दर्जा आम्ही तपासला. या चिक्कीचा दर्जा योग्य असल्याचा अहवाल. काही तक्रारी आल्यास कंत्राटदारांवर कारवाई करू...
- केंद्र सरकारकडून आलेला 122 कोटींचा निधी वाया जाऊ नये, यासाठी एका दिवसात 24 जीआर काढले. एवढाच त्यामागे उद्देश होता.
- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने पूर्वीच दिलेल्या रेट कॉन्ट्रॅक्टच्या दरानुसारच खरेदी झाली आहे...
- पंकजा यांनी मर्जीतल्या कंत्राटदाराला जालन्यात जलयुक्त शिवार योजनेतील काम दिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्याला उत्तर देताना पंकजांनी सांगितले की, ज्यांना कंत्राट दिले गेले आहे त्यांच्याशी माझा संबंध नाही. उलट वर्षभरापूर्वी कंत्राटदार गुट्टे हे राष्ट्रवादी पक्षात होते. यावेळी पंकजांनी पवारांसोबतची त्यांची छायाचित्रे दाखवली.
- महाराष्ट्राला कुपोषणाचा डाग लागला आहे. त्यासाठी ठोस व बोल्ड निर्णय घेण्याची गरज आहे. मी आदिवासी मुलांना पोषक आहार मिळावा म्हणूनच तसा निर्णय घेतला. या निर्णयाचे कौतूक होण्याऐवजी माझ्यावर आरोप होताहेत याची खंत वाटते.
- विरोधकांनी विश्वासर्हतेचे राजकारण करावे. कारण शेवटी हा विषय राजकारणाच्या विश्वासर्हतेचा आहे.