आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे साहेबांच्या निधानानंतर मला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर होती- पंकजा मुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- माझे बाबा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनानंतर मला त्यांच्या जागेवर केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. विशेष म्हणजे पंकजा यांनी हा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच केल्याने त्याला एक प्रकारे अधिकृत दुजोरा मिळाल्याचे मानले जात आहे. आपल्याला माहित असेलच की, केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर आठ दिवसाच्या आतच गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन झाले होते. मुंडे यांच्या अचानक जाण्याने भाजपने देशातील एक मोठा लोकनेता गमावला होता.

 

शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यावेळी फडणवीस यांच्यासमवेत पंकजा मुंडे, गिरीश महाजन होते. यादरम्यान एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हे विधान केले.

 

पंकजा मुंडे म्हणाल्या, तुमचे- माझे आधारवड असलेले मुंडे साहेब आपल्याला अचानक सोडून गेले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश शोकसागरात बुडाला होता. साहेबांचा राख सावडण्याचा दिवस होता. त्याच दिवशी मला केंद्रात मुंडे साहेबांच्या जागेवर मंत्रिपदाची ऑफर दिली गेली. मात्र, मी नकार दिला असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...