आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणाला अधिक मिळाले यावरूनच भांडण, अमित शहा यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यातील मेळाव्यात बोलताना राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सरकार जनतेच्या हिताचे विचार करत असते. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील दोन पक्ष केवळ त्यांच्यापुरताच विचार करत होते. कोणाला अधिक मिळाले, यावरूनच हे पक्ष भांडत राहिले, असा टोला शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला लगावला.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचे कौतुक करत शहा यांनी गत यूपीए सरकारवरही हल्ला चढवला. 10 वर्षांपासून आपण पंतप्रधानाला कधी बोलताना पाहिले नव्हते, पण आता आपल्याला बोलणारे पंतप्रधान मिळाले असल्याचे अमित शहा म्हणाले. पंतप्रधानांना आता लाल किल्ल्यावरून भाषण करण्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेटची गरज भासत नाही, असेही ते म्हणाले. फुटीरतावाद्यांना स्पष्टपणे सुनावणे असो किंवा काळा पैसा परत आणण्यासाठी पावले उलचणे असो, मोदी सरकारने सर्व जनहिताचे निर्णय घेतले असल्याचे अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील जनतेने एकदा संधी दिल्यास आपण महाराष्ट्राला सन्मान परत मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी शहा यांनी दिले.
पुढील स्लाइडवर वाचा, पंकडा मुंडेंच्या संघर्ष यात्रेच्या समारोपाबाबत...