आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात स्मार्ट ग्राम योजना ४०० गावांत राबवणार: मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्मार्ट सिटीच्या धर्तीवर राज्यात स्मार्ट ग्राम योजना राबवण्यात येणार असून, त्यात ४०० गावांचा समावेश असेल. लवकरच प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली.

स्मार्ट गाव योजनेचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर झाले. परंतु त्यात आपण काही बदल सुचवल्याचे सांगून मुंडे म्हणाल्या की, नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्त वापर केला जाईल. सौरऊर्जेद्वारे विजेची गरज भागवणे, पावसाचा प्रत्येक थेंब वाचवणे, ग्रामस्थांना शेतीतूनच वर्षभराचा खर्च निघेल अशी व्यवस्था, गर्भवती, त्यांची प्रसूती, मुलींच्या संगोपनावरही लक्ष असेल. सरपंच, ग्रामसभेबरोबरच गाव समितीच्या माध्यमातून याेजना राबवली जाईल.

राळेगणचा आदर्श
राळेगण व हिवरेबाजारच्या धर्तीवर योजनेतील गावांचा विकास अपेक्षित असेल. औरंगाबादमधील पाटोदा व मेळघाटचे देवगाव असेच स्मार्ट गाव आहे. पाटोद्यात सिमेंटऐवजी पेव्हर ब्लॉकचे रस्ते करून पावसाचे पाणी झिरपण्याची व्यवस्था आहे. पाण्याच्या मशीन गावात आहेत. सौरऊर्जेद्वारे गावाच्या विजेची गरज भागते.
बातम्या आणखी आहेत...