आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जलसंधारण\' काढल्याने पंकजा नाराज, CM नी काढली समजूत, कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारानंतर या नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. यात पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्र्यांचे पंख छाटण्यात आले आहे. खातेवाटपात पंकजा मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे, त्यांच्याकडून जलसंधारण खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या आहे. त्यांनी आपली नाराजी 'ट्विटर'वर व्यक्त केली आहे.
पंकजा समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
अहमदनगरमधील पाथर्डी येथे पंकजा मुंडे यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला. पंकजा यांचे जलसंधारण मंत्रालय काढल्याने कार्यकर्ते चिडले आहेत. त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही केली.

पंकजा मुंडेंनी केले ट्‍वीट, 'मी जलसंधारण खात्याची मंत्री नाही....'
पंकजा मुंडे सध्या सिंगापूरला आहेत. वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित राहाण्यासाठी पंकजा गेल्या आहे. पण, त्यांचे जलसंधारण खाते काढून घेतल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या आहेत. त्यामुळे आपण मंत्री नसल्याने या समिटला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांने 'ट्वीट' केले आहे. विशेष म्हणजे पंकजा यांच्या 'ट्‍वीट'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिट्‍वीट केले आहे. 'खात्याची मंत्री म्हणून नाही तर सरकारची प्रतिनिधी म्हणून या समिटला उपस्थित राहा', असे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री व पंकजा यांच्या 'ट्‍वीट-रिट्‍वीट'मुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

नव्या मंत्र्यांचे खाते वाटप व फेरबदल
कॅबिनेट पदे
> चंद्रकांत पाटील - महसूल आणि सार्वजनिक बांधकाम
> गिरीश महाजन - वैद्यकीय शिक्षण, जलस्राेत
> चंद्रशेखर बावनकुळे - ऊर्जा, उत्पादन शुल्क
> राम शिंदे- जलसंधारण, शिष्टाचार
> महादेव जानकर- पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य
> संभाजी निलंगेकर - कामगार, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन
> सुभाष देशमुख- वस्त्रोद्योग, पणन, सहकार
> पांडुरंग फुंडकर- कृषिमंत्री
> जयकुमार रावल - रोहयो, पर्यटन
राज्यमंत्री पदे
> दीपक केसरकर- गृह (ग्रामीण), वित्त
> गुलाबराव पाटील - सहकार
> अर्जुन खोतकर- वस्त्राेद्याेग, पशु संवर्धन, दुग्ध
> सदाभाऊ खोत - कृषी, पणन
> मदन येरावार- ऊर्जा,
> रवींद्र चव्हाण - बंदरे, आरोग्य.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नाराज पंकजा मुंडे यांच्या ट्‍वीटवर मुख्यमंत्र्यांनी केलेले रिट्‍वीट... त्यावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या.... वाचा

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...