आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Palve Munde News In Marathi, Gopinath Munde, Divya Marathi

पंकजा मुंडे यांची राज्यात ‘पुन्हा संघर्ष यात्रा’, सिंदखेडराजापासून होणार सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकत विधानसभा निवडणुकीपूर्वी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे मुंडे राज्यभरात ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ काढणार आहेत. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा पासून या यात्रेला सुरुवात होणार असून राणी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीपर्यंत या यात्रेचा प्रवास असणार आहे.
येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आणि दोन टप्प्यांत पार पडणा-या या यात्रेला अखेरीस प्रदेश भाजपने हिरवा कंदील दाखवला असून या यात्रेत राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरचे प्रमुख नेतेही सहभागी होणार आहेत.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी 1994-95 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ऐतिहासिक संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच ढवळून काढले होते. या यात्रेमुळे तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधी वातावरण तयार होऊन त्याचा फायदा युतीला झाला होता. आता हाच फॉर्म्युला त्यांची कन्या पंकजा पालवे मुंडे यांनी पुन्हा एकदा वापरण्याचे ठरवले आहे.

अमित शहा येणार : फडणवीस
या संघर्ष यात्रेतील विविध टप्प्यांवर राज्यातील तसेच राष्ट्रीय स्तरावरचे अनेक नेते सहभागी होणार असून अमित शहांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आमचे प्रयत्न असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली.