आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankja Palve munde, Girl Child Fetal, Vidya Chauvan

पंकजा पालवे-मुंडेंकडून विद्या चव्हाणांविरोधात हक्कभंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी बदनामी केल्याप्रकरणी आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी मंगळवारी विधानसभेत हक्कभंगाची तक्रार दाखल केली. ही तक्रार आता चौकशीसाठी हक्कभंग समितीकडे पाठवण्यात येणार आहे. परळीच्या डॉ. सुदाम मुंडे प्रक रणात स्थानिक आमदार आणि खासदार यांचा हस्तक्षेप होता, असा बिनबुडाचा आरोप आमदार विद्या चव्हाण यांनी करून आपली नाहक बदनामी केल्याची तक्रार भाजपच्या परळीतील आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी विधानसभेत केली. तसेच स्त्री भ्रूणहत्या प्रकरणांविरोधातील पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या समितीच्या आपण सदस्या असून या चळवळीत आपण भरीव योगदान देत असताना, असे आरोप करून आमदार विद्या चव्हाण यांनी सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारची वक्तव्ये केल्याचा खेद व्यक्त केला. डॉ. सरस्वती मुंडे गोपीनाथ मुंडे यांना राखी बांधत असल्याचा खोटा उल्लेखही चव्हाण यांनी केला असून याबाबतची तक्रारही पालवे यांनी दाखल केली.
डॉ. मुंडेचे लागेबांधे थेट पवारांशीच; गोपीनाथ मुंडे यांचा आरोप