आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारोंच्या साक्षीने महाकवी चैत्यभूमीवर विसावला, नामदेव ढसाळ अनंतात विलीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाकवी, विचारवंत व दलित पँथरचा 4 दशकांमधील बुलंद आवाज नामदेव ढसाळ आज अनंतात विलीन झाले. दादरमधील चैत्यभूमी स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता ढसाळ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी दोन वाजल्यानंतर वडाळ्यापासून दादर अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाल्याने अंत्ययात्रा दादरला यायला सुमारे तीन तास लागले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्ययात्रेला व अंत्यसंस्काराला साहित्यिक, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह तरुणांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
नामदेव ढसाळ यांचे 64 व्या वर्षी आतड्याच्या कर्करोगाने बुधवारी पहाटे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाने विद्रोहाचा एक कालखंड पडद्याआड गेला आहे.