आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ काम पेपरलेस; आमदारांना टॅब मिळणार; ५० कोटींचा खर्च वाचणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधिमंडळाचे कामकाज लवकरच पेपरलेस होणार असून सर्व आमदारांना सरकारकडून टॅबलेट देण्यात येणार आहेत. नागपूर येथे डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात टॅब्लेट वाटप होईल.

टॅब्लेट खरेदीसाठी सरकारने एका समितीची नेमणूक केली होती. समितीतील सदस्य विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, समितीने कोटींच्या टॅब्लेट खरेदीला मान्यता दिली आहे. याआधी विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान विविध समित्यांचे अहवाल, दैनंदिन अहवाल आणि इतर माहितीच्या छपाईसाठी सरकारला ५० कोटी रुपयांचा खर्च लागत होता. मात्र, टॅब खरेदीमुळे हा खर्च केवळ कोटींवर येणार आहे. देशात सध्या गोवा आणि हरियाणा येथे टॅब्लेटद्वारे कामकाज चालते. दोन्ही राज्यांत कसे काम चालते याचा अभ्यास राज्यातील अधिकारी करत आहेत. दिवाळीनंतर टॅबची खरेदी करण्यात येईल, असेही ठाकरे म्हणाले. विधानसभेत २८८, तर विधान परिषेदत ७८ आमदार आहेत.

हायस्पीड इंटरनेट
आमदारांना टॅब्लेटचे वाटप केल्यानंतर विधिमंडळात हायस्पीड इंटरनेट सेवा देण्यात येईल. जेणेकरून माहिती शोधण्यात वेळ जाणार नाही. कामकाजही वेळेत पूर्ण होईल.
बातम्या आणखी आहेत...