आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pappu Kalani's Post Going, State Election Commission Take Action

पप्पू कलानीचे पद जाणार!,दोषी लोकप्रतिनिधींवर राज्य निवडणूक आयोगाचा ‘फास’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या लोकप्रतिनिधींवर कारवाईचा फास आवळण्यास राज्य निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. उल्हासनगरचा नगरसेवक व एका खून प्रकरणात शिक्षा झालेला पप्पू कलानी याच्यापासून त्याची सुरुवात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोषी गुन्हेगारांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची निवडणूक कायद्यात तरतूद असतानाही गेल्या काही वर्षांत अनेक कुख्यात गुंड कायदा धाब्यावर बसवून लोकप्रतिनिधी झाले आहेत. आता अशा गुन्हेगारांना राजकीय अभय न मिळू देता, त्यांचे पद गोठवण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाने सुरू केल्या आहेत.
23 वर्षांपूर्वी इंदर भटिजाची हत्या केल्याप्रकरणी पप्पू कलानीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सूत्रांच्या मते, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 10 (अ) अन्वये शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीचे लोकप्रतिनिधित्व रद्द करण्यासह त्याला पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाते. या नियमाच्या आधारे कलानीचे नगरसेवकपद रद्द करावे, असा आदेश देण्याची सूचना निवडणूक आयोग उल्हासनगर आयुक्तांना देणार असल्याचे समजते.
काय आहे नियम
आमदार-खासदारांसाठी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल अ‍ॅक्टच्या कलम आठ अन्वये असा नियम आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी हा कायदा आहे. आतापर्यंत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. शिक्षा होऊन सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवण्यास पात्र आहे. मात्र, शिक्षा घोषित झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत निवडणूक आयोग आरोपीचे पद रद्द करण्याची कारवाई करू शकते.