आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parali State Election, Pankaja Munde Vs Dhananjay Munde

परळीत पंकजा मुंडेंविरुद्ध धनंजय मुंडे अशी बहीण-भावाची लढत होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानसभेसाठी परळी मतदारसंघातून आमदार धनंजय मुंडे निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. परळीची जागा आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे आहे. मात्र, काँग्रेसच्या विरोधाला जुमानता मंगळवारी या जागेसाठी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी धनंजय यांची मुलाखत घेतली. त्यामुळे परळीतील भाजपच्या आमदार पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय अशी बहीण - भावाची लढत होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना साेमवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. गेवराईतून बदामराव पंिडत, बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर, आष्टीतून सुरेश धस आणि केजमधून पृथ्वीराज साठे या आमदारांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, असे चित्र दिसले. त्यांच्याशिवाय इतर कोणीही इच्छुक नव्हता.

माजलगावमध्ये मात्र माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे िजल्हाध्यक्ष अशोक डक यांनी उमेदवारी मागितली आहे. सोळंके यांचा मंत्री म्हणून मराठवाड्यासाठी फायदा झाला नाही. माजलगावमध्येही सोळंकेंना राष्ट्रवादीचा विस्तार करता आलेला नाही, अशी भूमिका डक समर्थकांनी घेतली. हेच मत डक यांनी मुलाखतीत मांडले.