आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळचे फुटपाथ रुग्णालये दत्तक घेणार; फेरीवाल्यांवर करणार कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील परळ एकेकाळी गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होते. आता मोठ्या रुग्णालयांमुळे ते ‘हेल्थ हब’ म्हणून ओळखले जात आहे. देशभरातून उपचारासाठी येथे हजारो रुग्ण येतात. राहण्यासाठी अनेक जण फुटपाथवर तंबू ठोकून राहतात. त्यामुळे या परिसरात कायदा-सुव्यवस्थेबरोबरच स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालये आणि पालिका प्रशासनाने फुटपाथ दत्तक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पालिकेने ‘मास्टर लिस्ट’ तयार केली आहे.

परळमध्ये टाटा कॅन्सर, वाडिया, केईएम आणि बच्चू अली या नामांकित रुग्णालयांसह अनेक छाेटी- माेठी सुसज्ज रुग्णालये आहेत. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी देशभरातून दररोज रुग्णांचा ओघ सुरू असतो. सतत येणे आणि मुंबापुरीत राहायची सोय नसल्याने रुग्ण त्यांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेरच्या फुटपाथवर राहतात. तसेच स्वयंपाकही येथेच करतात. ग्राहकांच्या शोधात फेरीवाले येतात. चहावाले मालाचे ठेलेही येथे लागतात. अन्नदानासाठी रांगा लागल्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. मात्र, पालिका आणि रुग्णालयांच्या वादात फुटपाथचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. आता मात्र पालिकेने यावर तोडगा काढण्याचे ठरवले असल्याचे दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.

रस्त्यावर राहणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी परळ भागात साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्याचा रुग्णांनाही संसर्ग होत असल्याचे ते म्हणाले.

>परळ येथीलसुविधा, कारवाई आणि जबाबदारी िनश्चितीसंदर्भात ‘मास्टर लिस्ट’ बनवण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. या िलस्टमुळे प्रशासन, रुग्णालये, पोलिस यांच्यात समन्वय राहील. कोणाकडे कोणती जबाबदारी आहे हे िनश्चित होईल. त्यासंदर्भात नुकतीच एक बैठकही पार पडली. रुग्णालयांनी आपल्या परिसरातील फुटपाथ दत्तक घेण्याचे नियोजन केले आहे. यापुढे फुटपाथवर कुणासही राहू िदले जाणार नाही. तेथे कुंड्या ठेवल्या जातील. अन्न वाटप रस्त्यावर करता रुग्णालयाच्या कँटीनमध्ये केले जाईल. फेरीवाल्यावर पालिका कारवाई करणार आहे.
- विश्वास मोटे, सहायुक्त आयुक्त, दक्षिण विभाग
बातम्या आणखी आहेत...