आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parlimentarian Nilesh Rane Treaten The Woman Wordan

खासदार नीलेश राणेंची महिला वॉर्डनला दमदाटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे उघडकीस येत असताना संसदेत कायदे करणारे खासदारही महिलांशी उद्धट वर्तणुकीत मागे नसल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

नारायण राणे यांचे पुत्र खासदार नीलेश राणे शुक्रवारी पश्चिम मुंबईतील खारमध्ये आले होते. तेथे ‘नो पार्किंग’मध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा लावण्यास ट्राफिक वॉर्डन अनिता लोबो यांनी विरोध केला. त्या वेळी राणे यांनी त्यांच्याशी हुज्जत घालत दमदाटी केली. तसेच राणे यांचे अंगरक्षक पोलिसांनीही लोबो यांच्यावर तोंडसुख घेतले. दरम्यान, खार पोलिसही घटनास्थळी पोहोचले. लोबो यांना खार पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्याकडून उद्धट वर्तन केल्याचा कबुलीजबाब लिहून घेण्यात आला. अनिता लोबो गेली अनेक वर्षे ट्राफिक वॉर्डनचे काम करतात. मुंबई पोलिसांच्या वतीने शहरातील वाहतुकीच्या नियंत्रणासाठी वॉर्डनची नेमणूक करण्यात येते. विशेष म्हणजे हे वार्डन मोफत सेवा देतात.