आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय मोदी यांनाच : पर्रीकर यापूर्वी कधीच अशी कारवाई झाली नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यूपीए सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा फेटाळून २९ सप्टेंबरला भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या कारवाईसारखी मोहीम यापूर्वी कधीही हाती घेण्यात आली नव्हती, असा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला.
दरम्यान, या सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय केवळ मोदींनाच असल्याचे ते म्हणाले. जवानांनी केलेल्या या यशस्वी कारवाईवरून सुरू असलेली चर्चा थांबायला हवी, असे ते म्हणाले. ही कारवाई लष्कराने केली आहे. राजकीय पक्षांनी नव्हे. याचे श्रेय सर्वच भारतीयांना द्यायला हवे. यात संशय व्यक्त करणा ऱ्यांनाही ते श्रेय आहेच. मात्र, याचे मोठे श्रेय पंतप्रधानांना जाते, असे पर्रीकर म्हणाले. ही योजना आखण्याचे थोडे श्रेय मी घेईन, असेही त्यांनी नमूद केले.यूपीए सरकारच्या काळातील सर्जिकल स्ट्राइकबाबत विरोधी पक्ष सीमा सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईचे दाखले देत आहेत. स्थानिक स्तरावर होणा ऱ्या अशा कारवाया सरकारला माहिती न देता केल्या जातात. मात्र, सर्जिकल स्ट्राइकमध्ये थोडीही चूक झाली तर त्याच्या परिणामांची जबाबदारी सरकारवर असते. म्हणूनच असे निर्णय घेण्यासाठी धाडस असावे लागते, असे पर्रीकर म्हणाले.
हा लष्कराचा अवमान
पर्रीकरांनी पूर्वीच्या कारवायांचे दावे फेटाळून एक प्रकारे सुरक्षा दलांचा अवमान केला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. लष्कराचे बलिदान पर्रीकर विसरले असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...