आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील टॉपचे धनाढ्य पारशी, पाहा कोणाची किती आहे नेमकी संपत्ती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेविल वाडिया (सर्वात लेफ्ट) कुटुंबियांसह.. - Divya Marathi
नेविल वाडिया (सर्वात लेफ्ट) कुटुंबियांसह..
मुंबई- देशातील महत्त्वाचा उद्योग समुह असलेल्या वाडिया ग्रुपच्या दिना वाडिया (98) यांचे गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये निधन झाले. दिना वाडिया यांनी सर नेविल वाडिया यांच्याशी वडिल मोहम्मद अली जिना यांच्याविरोधात जाऊन लग्न केले होते. त्याकाळी जिना हे स्वातंत्रपूर्व हिंदुस्थानचे मोठे नेते होते. तर सर नेविल वाडिया हे उद्योगधंद्यातील मोठे नाव होते. दिना या वडिलांकडून मुस्लिम असल्या तरी आईकडून त्या पारशी होत्या. 
 
आई रूटीचे वयाच्या 29 व्या वर्षी निधन झाल्यानंतर दिनाचा सांभाळ रूटीच्या आईनेच केला होता. त्यामुळे तिच्यावर पारशी समाजाचे संस्कार झाले. पुढे त्यांनी वडिलांचा विरोध डावलून पारशी तरूण नेविल यांच्याशी प्रेमविवाह केला. अर्थातच त्याला त्यांच्या आजीचा पाठिंबा होता. पुढे नेविल यांनी उद्योगधंद्यात मोठे नाव कमावले. आज वाडिया समूहाकडे 9. 5 बिलियन यूएस डॉलरची संपत्ती व भागभांडवल आहे.
 
आज वाडिया समूहातर्गंत गो एयर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, बॉम्बे डाईंग, बॉम्बे रियालिटी, बॉम्बे बुरमाह ट्रेडिंग कार्पोरेशन, नॅशनल पॅरॉक्साईड आदी कंपन्या कार्यरत आहेत. यात दिना वाडिया आणि नेविल वाडिया यांचे मोठे योगदान राहिलेले आहे.
 
खरं तर भारतात पारशी समुदाय फारच कमी आहे. मुंबईत फक्त काही शेकडो कुटुंबिय राहतात. मात्र, हा समुदाय उद्योग क्षेत्रात कमालीचा प्रगत आहे. आज पारशी कम्यूनिटीचे देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि औद्योगिक विकासात मोठे योगदान राहिले आहे. टाटा समूह, शापूर पालोनची समूह, गोदरेज समूह, सायरस पूनावाला आणि वाडिया समूह अशी अनेक नावे घेता येतील. आज यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी देशातील सर्वाधिक धनाढ्य पारशी उद्योगपतींविषयी माहिती घेऊन आलो आहोत.
 
पुढील स्‍लाईडवर वाचा, देशातील सर्वाधिक धनाढ्य पारशी उद्योग घराण्याबाबत...
बातम्या आणखी आहेत...