मुंबई - आज (मंगळवार) जगभरातील पारशी बांधव पतेती हा सण उत्साहात साजरा करत आहेत. पारशी धर्म हा जगातील प्राचिन धर्मापैकी एक आहे. पण, आजघडीला जगाच्या पाठीवर या धर्माची लोकसंख्या केवळ 3 लाख एवढची आहे. त्यातही सर्वाधिक पारशी भारतात आणि त्यातल्या त्यात मुंबईत राहतात. या धर्माचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पारशी लोकांचे निधन झाले तर त्यांचा त्यांचा अंत्यसंस्कार केला जात नाही. मग मृतदेहाचे काय केले जाते, कुठे ठेवला जातो. याची खास माहिती divyamarathi.comच्या वाचकांसाठी...
मृतदेह आकाशाला सोपविले जातात
पारशी समाजाता गिधाडांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर मृतदेहा अग्नी दिली जात नाही वा दफनही गेला नाही. तो गिधाडांना खाण्याचा दिला जातो. यासाठी मुंबईमध्ये 'टॉवर ऑफ सायलंस' बांधण्यात आले आहे. ही मुंबई शहरातील पारशी लोकांची स्मशानभूमी आहे. येथील गोलाकार इमारतीत मृतदेह ठेवला जातो. त्यानंतर वर गिधाड येतात आणि आपली भूमिका बजावतात. या संपूर्ण प्रक्रियेला 'दोखमेनाशीनी' तर इमारतीला 'दाख्मा' म्हटले जाते.
मुंबईतील मलबार हिल्सवर आहे हे कब्रस्तान
मुंबईतील पॉश मलबार हिल्स परिसरात पारशी समाजाचे कब्रस्तान आहे. याच्या चारही बाजूंना घनदाट झाडे आहेत. 19 व्या शतकात याचे बांधकाम करण्यात आले होते. टॉवर ऑफ सायलंसला केवळ एकच दार आहे. याला छत नाही. येथे मृतदेहांना गिधाडांच्या स्वाधीन केले जाते.
पुढील स्लाईडवर वाचा गिधाडच नाही तर अंत्यसंस्कार कसे....