आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिधाडांना सोपविले जातात मृतदेह, या समाजात असा विचित्र होतो अंत्यसंस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दुर्मिळ पक्षी, प्राणी आणि किटक काही वर्षांनी दिसेनासे होतील असे सांगितले जाते. पण मानवातही एक समाज आहे ज्याची लोकसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. पुढील शतकापर्यंत या समुदायातील व्यक्ती जिवंत नसतील, असे सांगितले जाते. होय, आम्ही भारतातील पारशी लोकांबद्दल बोलतोय. भारतातील पारशी समुदाय विलुप्त होण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात काहीच पारशी राहिले आहेत. त्यातील बहुतांश लोक मुंबईत राहतात. त्यांचे टॉवर ऑफ सायलंस नावाने कब्रस्तान आहे. पारशी समुदायातील लोकांचा मृत्यू झाल्यावर मृतदेह येथील एका गोलाकार इमारतीत ठेवून गिधाडांच्या स्वाधिन केले जातात.
मृतदेह आकाशाला सोपविले जातात
पारशी समाजाता गिधाडांना खुप महत्त्व आहे. पृथ्वी, जल आणि अग्नी पारशी समाजात फार पवित्र समजले जातात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर मृतदेह या तीन तत्त्वांना सोपविला जातो. यासाठी टॉवर ऑफ सायलंस बांधण्यात आले आहे. येथील गोलाकार इमारतीत मृतदेह ठेवले जातात. त्यानंतर गिधाड आपली भूमिका बजावतात. या संपूर्ण प्रक्रियेला “दोखमेनाशीनी” तर इमारतीला “दाख्मा” म्हटले जाते.
मुंबईतील मलबार हिल्सवर आहे हे कब्रस्तान
मुंबईतील पॉश मलबार हिल्स परिसरात पारशी समाजाचे कब्रस्तान आहे. याच्या चारही बाजूंना घनदाट झाडे आहेत. 19 व्या शतकात याचे बांधकाम करण्यात आले होते. टॉवर ऑफ सायलंसला केवळ एकच दार आहे. याला छत नाही. येथे मृतदेहांना निसर्गाच्या स्वाधिन केले जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, पारशी समाजाची लोकसंख्या कमी का झाली....