मुंबई- 'लिव्ह-इन-रिलेशनशीप'मध्ये राहणाऱ्या मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरातील एका जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वाती गोहिल आणि विवेक गुप्ता असे या जोडप्यातील दोघांची नावे आहेत.
शेजा-यांना आली दुर्गंधी..
- स्वाती व विवेक एमआयडीसीमधील धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत होते.
- त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे शेजा-यांच्या लक्षात आले.
- शेजारी राहणा-या काही लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
- पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाची पाहणी केली.
- पोलिसांना घटनास्थळावर दोन मृतदेह आढळले.
दोघांना करायचे होते लग्न..
- दोघांनीही तीन ते चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
- स्वाती वॉक्हार्ट हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती.
- स्वाती विवेकसोबत 'लिव्ह-इन'मध्ये राहत होती.
- दोघांनाही काही दिवसांनी रीतसर लग्न करायचे होते.
- पण, त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांची परवानगी मिळत नव्हती.
- या दोघांनी नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
- घटनास्थळावरून पोलिसांनी एक सुसाइड नोट जप्त केली आहे.
- त्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.