आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल? कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे पद मराठवाड्याकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य शेतमाल भाव समितीचे रुपांतर राज्य कृषी मूल्य आयोगात करण्यात आल्यानंतर या नव्या आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपचे मराठवाड्यातील शेतकरी नेते माजी आमदार पाशा पटेल यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता अाहे. दोन आठवड्यात याबाबतचा निवडीचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१९८० मध्ये राज्य शेतमाल भाव समितीची स्थापना करण्यात आली. प्रमुख शेती पिकांच्या उत्पादनखर्चाचा अंदाज काढणे, वाजवी िकफायतीशीर शेतमालाच्या हमी भावासाठी िशफारशी करणे याची जबाबदारी समितीकडे होती. समितीच्या सदोष व्यवस्थेवर मोठे आक्षेेप घेण्यात आले. त्यामुळे समिती बरखास्त करुन त्याजागी आयोग स्थापना करण्याचा िनर्णय आघाडी शासनाने घेतला होता. त्यानुसार मागच्या आठवड्यात राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली आहे. अध्यक्ष अाणि १२ सदस्य असलेल्या या आयोगावर पहिल्यांदाच एकही मंत्री असणार नाही. असा कृषी मूल्य आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे.
ही अाहे आयोगाची जबाबदारी
पिकांच्याउत्पादन खर्चाचा अंदाज काढणे, खुल्या बाजारात सरकारला हस्तक्षेप करण्यासाठी सल्ला देणे, कृषी धोरणाबाबत सल्ला देणे, हमीभावासाठी शिफारसी करणे, कृषी विपणन व्यवस्था मजबूत करणे, उत्पादक ते ग्राहक अशी साखळी तयार करणे आदी सल्ले आयोगामार्फत देण्यात येतात.

पाशा पटेल का?
या आयोगाच्या अध्यक्षपदी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ अाणि शेतमालाच्या भावाचे ज्ञान असलेली व्यक्ती असावी अशी तरतूद आहे. पटेल शेतकरी संघटनेमधून आलेले लढाऊ नेते आहेत. शेतीउत्पादनाच्या हमीभावासाठी त्यांनी ‘लातूर ते नागपूर’ अशी िदंडी काढली होती. पक्षाने त्यांना िवधानपरिषदेवर संधी िदली होती. पटेल यांच्याशिवाय भाजपमध्ये शेतीची जाण असणारा दुसरा नेता नाही. ते सध्या भाजपच्या केंद्रीय कृषी समितीवर आहेत.