आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passengers Were Pleading, Shouting And Begging In Front Of Air India Staff

VIDEO: आईसाठी हमसून हमसून रडली महिला तरी \'एअर इंडिया\'ला फुटला नाही पाझर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: एअर इंडियाच्या स्टाफची एंट्रीसाठी गयावया करणारी महिला प्रवाशी)

मुंबई- 'एअर इंडिया'ने एका महिला प्रवाशीला वाईट वागणूक दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला हमसून हमसून रडताना दिसत आहे. 'आईची तब्बेत ठीक नसून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. मला विमानात जाऊ द्या', अशी एअर इंडियाच्या स्टाफच्या गयावया करत असल्याचे दिसत आहे. तरी देखील तिला एअर इंडियाचा स्टाफ तिला कुठलाही सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत नाही.
मुंबई एअरपोर्टवरील हा व्हिडिओ असून तो 14 फेब्रुवारीचा आहे. फ्लाइटच्या निर्धारित वेळेपूर्वी 55 मिनिटे आधी पोहोचलेल्यानंतर देखील एका महिलेची एंट्री करण्यास स्पष्‍ट नकार देताना एअर इंडियाचा स्टाफ दिसत आहे. पाच मिनिटे उशीर झाल्यामुळे आधी महिला प्रवाशीने त्यांची माफी मागितली. तरी देखील स्टाफने साधे सौजन्य दाखवले नाही. नंतर महिला प्रवाशी अक्षरश: स्टाफच्या गयावया करते. विमानाच्या निर्धारित वेळेपूर्वी 55 मिनिटे आधीच एअरपोर्टवर पोहोचलो होतो. मात्र, तेव्हा एअर इंडियाच्या स्टाफने 60 मिनिटे आधी हजर राहाणे बंधनकारक असल्याचे सुनावले. त्यावर प्रवाशी महिलेने एअर इंडियाच्या अधिकार्‍यांना ट्रॅव्हल पोर्टलद्वारा पाठवलेला एसएमएस दाखवला. त्यात लिहिले होते की, फ्लाइटच्या निर्धारित वेळे आधी 45 मिनिटे आधी एअरपोर्टवर पोहोचणे बंधनकारक आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, फेसबुकवर व्हायरल झालेला घटनेचा व्हिडिओ...