आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patangrao Kadam Clerification On Cabinet Meeting Conflicts

नारायण राणेंशी माझा कोणताही वाद नाही- बाबांपाठोपाठ पतंगरावांचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इको सेन्सिटिव्ह झोन या मुद्यावरून माझ्यात आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात कोणताही वाद नाही, असे स्पष्टीकरण वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिले आहे. राणे आणि पतंगराव यांच्यात काल झालेल्या कॅबिनेटमध्ये कोकणातील 192 गावांत इको सेन्सिटिव्ह झोनची अंमलबाजवणी सुरू झाल्याने खंडाजगी झाली होती. मात्र, आमच्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्टीकरण कदम यांनी दिले.
कदम म्हणाले, मी राज्याचा वनमंत्री आहे. तसेच पश्चिम घाटाच्या तरतुदी व शिफारशी या केंद्राने नेमलेल्या समितीने सादर केल्या आहेत. त्यामुळे या घटनेशी माझा संबंध नाही. लोकांचे नुकसान होणार असेल तर मलाही असा इको सेन्सिटिव्ह झोन पसंत पडणार नाही. त्यामुळे राणेंच्या विरोधात मी नाही व या यामुद्याबरोबर इतर कोणत्याही बाबींवरून आमच्यात मतभेद, वाद नाहीत. माध्यमांनी काल दिलेल्या साफ खोट्या आहेत, असे सांगत सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाच राग कदम यांनी आवळला.