आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेना उत्तर द्यायला मी बांधील नाही : पतंगराव कदम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- आज राज ठाकरे काही घोषणा करताहेत, उद्या आणखी कोणी काही म्हणेल, मी प्रत्येकाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी फक्त मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला बांधील आहे, असा टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी राज ठाकरे यांच्या ताडोबा दौरयावरून लगावला.
राज ठाकरे यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देवून वाघांची शिकार करणारयांना पकडून देणारयांना 1 लाख रुपयांचे तर शिकारयांचा खात्मा करणारया अधिकारयाला 5 लाख रुपयांचे बश्रिस देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी पतंगराव कदम यांच्यावरही टिका केली. यासंदर्भात पतंगराव कदम यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘आज राज ठाकरे काही बोलले उद्या आणखी दुसरा कोणी दुसरेच बोलेल. मी प्रत्येकाला उत्तर द्यायला बांधील नाही. मला असल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत.’’
पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांना अनुशेषातून वगळण्याच्या सरकारच्या मागणीविषयी ते म्हणाले, ‘‘हा विषय संवेदनशिल आहे. आम्हाला सर्वच योजना पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी निधी आणायची जबाबदारी आमची आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहे.’’
शिकार्‍यांची माहिती देणार्‍यांना 2 लाख, वाघ वाचवण्यासाठी राज ठाकरेंची घोषणा