आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवई लेक व्ह्यू दुर्घटना: आगीतील बचावकार्य चौघांच्या जिवावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पवईच्या लेक व्ह्यू इमारतीत शनिवारी लागलेल्या आग दुर्घटनेत िलफ्टमध्ये गुदमरून मृत्यू पावलेले चार तरुण आगीत सापडलेल्या रहिवाशांची सुटका करण्यासाठी धावून गेले होते. बचावकार्य जलदगतीने करण्यासाठी त्यांनी िलफ्टचा वापर केला आणि हाच िनर्णय त्यांच्या जिवावर बेतल्याचे वास्तव समोर आले आहे.

बाबू लोहार (ड्रायव्हर), प्रदीप सरकार(सोसायटीचा वायरमन), िहरालाल गुप्ता (सुरक्षारक्षक) आणि तौफीक शेख (मनसे कार्यकर्ता) अशी िलफ्टमध्ये गुदमरून मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

एसीमध्ये शाॅर्टसर्किट होऊन लागलेली आग पाहता पाहता संपूर्ण १४ व्या मजल्यावर पसरली. आगीचे लोट िदसताच इमारतीशेजारी राहणारे चार तरुण बचावासाठी धावून गेले. लिफ्टने जाता या चार तरुणांनी १३ मजले चढून अनेक रहिवाशांना सुखरूप खाली आणले. पंधराव्या मजल्यावरील काही लोकांना आणण्यासाठी िजन्याने वरती गेले. काही रहिवाशांना खाली घेऊन आलेही. दोन वेळा वरखाली केल्याने थकलेल्या या तरुणांनी या वेळी मात्र िलफ्टचा वापर करण्याचे ठरवले. चौघे तरुण िलफ्टमध्ये बसले आणि िलफ्ट सुरू केली. मात्र, दुर्दैवाने िलफ्ट चौदाव्या मजल्यावर येताच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. इतक्यात िलफ्टमध्ये शाॅर्टसर्किट झाले. गुदमरू लागलेल्या या तरुणांनी आकांत सुरू केला. पण त्यांच्या मदतीला कोणी आले नाही. िलफ्टमध्ये कोणी अडकले असावे अशी शंकाही कुणाच्या गावी नव्हती. त्यानंतर ओटीस कंपनीचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी िलफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला पण यश अाले नाही. साधारण तीन तासांनी अग्निशमन दलाने आगीवर िनयंत्रण िमळवले. त्यानंतर लिफ्टचे दरवाजे तोडण्यात आले. तेव्हा त्यात या तरुणांना हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

लिफ्टचा वापर घातकच
आगीत लिफ्टचा वापर धोकादायक असल्याचा अनुभव मुंबापुरीने पुन्हा एकदा घेतला आहे. २००९ मध्ये ठाण्यातील समतानगर येथील इमारतीच्या १४ व्या मजल्याला आग लागली होती. ती िवझविण्यास जात असताना अग्निशमन दलाच्या सहा अधिकाऱ्यांनी िलफ्टचा वापर केला होता. त्या वेळी सहा अधिकारी िलफ्टमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडले होते.
बातम्या आणखी आहेत...