आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रामध्ये कोसळलेल्‍या हेलिकॉप्टर अवशेष सापडले; पायलट बेपत्ताच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेलिकॉप्‍टचे सापडलेले अवशेष. - Divya Marathi
हेलिकॉप्‍टचे सापडलेले अवशेष.
मुंबई - मुंबईजवळील अरबी समुद्रात बुधवारी रात्री 7.30 वाजताच्‍या सुमारास 14 आसनी पवनहंस हेलिकॉप्टर कोसळले असून, दोन वैमानिक बेपत्ता झाले आहेत. दरम्‍यान, वैमानिकांचा शोध घेण्यासाठी रात्रीपासूनच नौदल तटरक्षक दलाने मोहीम सुरू केली आहे. आज (गुरुवार) सकाळपर्यंत दोनही वैमानिक सापडू शकले नाहीत. दरम्‍यान, हेलिकॉप्‍टचे अवशेष सापडले आहेत. ही दुर्घटना दक्षिण मुंबईपासून 80 नॉटीकल मील अंतरावर उत्तर-पश्चिम परिसरात झाली.

अंधरामुळे बचाव कार्यात अडथळा
ही दुर्घटना रात्री घडल्‍याने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला. आयएनएस मुंबईलासुद्धा हेलिकॉप्टर शोधण्‍यासाठी पाठवण्‍यात आले. अंधरात हेलिकॉप्‍टरचे लॅण्डिग कसे करावे, याचा सराव या हेलिकॉप्‍टरचे दोन वैमानिक करत होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटो...