आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pawar Accept's That Dawood Had Given Proposal For Surrender

दाऊदचा शरणागतीचा प्रस्ताव होता, पण अटींमुळे धुडकावला; पवारांची कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची शरणागती पत्करण्याची तयारी असल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी आपल्याशी संपर्क साधून सांगितले होते. परंतु शरणागतीसाठी दाऊदने अटी घातल्या होत्या. त्या मान्य करण्यासारख्या नसल्यामुळे शरणागतीचा प्रस्ताव धुडकावण्यात आला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्यसूत्रधार दाऊद भारतीय अधिकाऱ्यांसमोर शरणागतीस तयार होता. परंतु तेव्हाच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी तो प्रस्ताव धुडकावला होता, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केला होता. त्यावर पवारांनी हे स्पष्टीकरण दिले.

राम जेठमलानी यांनी दाऊदच्या शरणागतीचा प्रस्ताव दिला होता हे खरे आहे. पण त्यासाठी त्याने घातलेल्या अटी कोणत्याही परिस्थितीत मान्य करण्यासारख्या नसल्याने तो आम्ही धुडकावून लावला होता, असे पवार म्हणाले.

काय होत्या अटी?
१९९० च्या दशकात शरद पवार मुख्यमंत्री असताना राम जेठमलानींमार्फत दाऊदने शरणागतीचा प्रस्ताव दिला होता.आपणास तुरुंगात ठेवू नये. घरीच राहण्याची परवानगी द्यावी, अशी अट होती. ज्याच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला आहे, त्याला अटक न करण्याची अट कशी मान्य होऊ शकते?, असे आम्ही सांगितले होते, असे शरद पवार म्हणाले.

दाऊदला पकडायला तो हलवा आहे का?
नवी दिल्ली | दाऊदनंतर डी-कंपनीचा क्रमांक दोनचा डॉन छोटा शकीलने केंद्र सरकार व गुप्तचर संस्थांची खिल्ली उडवली. भारतात नवे सरकार आले की त्याला (दाऊद) भारतात आणूच, त्याच्या मुसक्या बांधूच असे सांगते.. दाऊद काय हलवा आहे?... त्याला बकरीचे पिल्लू समजले की काय?, असे छोटा शकीलने एका इंग्रजी वृत्तपत्राला कराचीतून दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
१९९३ च्या स्फोटानंतर आम्ही भारतात परतण्यास तयार होतो तर तुमच्या (भारत) सरकारने परवानगी नाकारली. भाई (दाऊद) राम जेठमलानींना लंडनमध्ये बोलले होते... परंतु तुमचे मंत्रालय व (लालकृष्ण) आडवाणींनी खेळ बिघडवला,असे तो म्हणाला.