आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pawar Express Disappointment To Jadhav Over The His Sun Marriage Over Expenditure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाधवांना मुलाच्या लग्नातील उद्धळपटीबददल पवारांनी सुनावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या मुलांच्या शाही लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करणारे राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व राज्यमंत्री भास्कर जाधव यांचे शरद पवार यांनी गुरुवारी कान उपटले. ‘जे लोक दुष्काळी परिस्थितीतही खोट्या
प्रसिद्धीसाठी उधळपट्टी करतात त्यांना पक्षातच नव्हे तर सार्वजनिक जीवनातही स्थान नाही,’ अशा शब्दांत पवारांनी सुनावले.

जाधव यांचे पुत्र समीर व कन्या कांचन यांचे विवाह सोहळे बुधवारी चिपळूण येथील रिसॉर्टमध्ये शाही थाटात झाले. संपूर्ण मंत्रिमंडळच यासाठी हजर होते. मात्र जनता दुष्काळाचे चटके सहन करत असताना लोकप्रतिनिधींनी अशी उधळपट्टी करणे योग्य नव्हे, अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिक व माध्यमांतून उमटल्या होत्या. शरद पवार यांनी या उधळपट्टीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘दुष्काळ असो की नसो, पण एवढी उधळपट्टी योग्य नाही. मी दूरचित्रवाहिनीवर हा थाट पाहिला तेव्हा मला झोप लागली नाही. माझे सहकारीच जर भान ठेवणार नसतील तर इतरांना काय सांगणार, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली.

सुप्रियाचे लग्न साधेपणाने
सामाजिक जीवनात असताना लोकप्रतिनिधींनी काही पथ्ये पाळावी लागतात, हे सांगताना शरद पवार म्हणाले की, मी सुप्रियाचे लग्न अत्यंत साधेपणाने लावले होते. मांडवदेखील घातला नव्हता. उपस्थित दोन लाख लोकांना फक्त अक्षता व पेढाच दिला होता,’ अशी आठवणही पवारांनी बोलून दाखवली.

दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे व विनोद तावडे यांनीही ‘कंत्राटदारांकडून भोजनावळी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे,’ अशा शब्दात जाधवांवर टीका केली.

माझे चुकलेच
पवारांनी कान टोचल्यानंतर राज्यमंत्री भास्कर जाधव भानावर आले. ते म्हणाले की, पवार साहेबांनी सांगितलेल्या गोष्टी मला मान्य आहेत. या चुकीबद्दल मी पवार साहेबांची व जनतेची माफी मागतो. लग्नासाठी उभारण्यात आलेला मंडप कोकाटे डेकोरेटर्स यांनी उभारला होता, तर जेवणाचा खर्च क-हाड येथील कंत्राटदार शहा यांनी केला आहे. एवढा खर्च करण्याची माझी ताकद नाही. कोयना येथील ठेकेदारीचे काम करणारे शहा यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध असून यापूर्वी मी त्यांच्याकडून कधी चहाही घेतलेला नाही, त्यामुळे त्यांनी हा खर्च केला.