आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांनी भरला अर्ज, एमसीए अध्यक्षपदासाठी मुंडेविरूद्ध रंगणार लढाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या अध्यक्षपदासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज सायंकाळी आपला अर्ज दाखल केला. भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी कालच अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करीत ही लढत मुंडे विरूद्ध पवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पवारांना महाडदळकर गटाने पाठिंबा दिला असून, या गटाचे एक सदस्य आशिष शेलार यांनी उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेत गोपीनाथ मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गोपीनाथ मुंडे अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्षपदाचाही अर्ज दाखल करणार आहे. ते उद्या किंवा परवा अर्ज दाखल करतील. कारण 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
एमसीएची निवडणूक कधी नव्हे एवढी चुरशीची होण्याची शक्यता आहे. पवारांना महाडदळकर गट, शेट्टी गट व विजय पाटील गटाचा पाठिंबा असल्याने ते अध्यक्षपदी सहज निवडून येतील असे बोलले जात आहे. त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांनी उपाध्यक्षपदासाठीही आपला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. महाडदळकर गटाचे व मुंबई शहर भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे उपाध्यक्षपदी अर्ज भरणार होते. मात्र आता त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेते मुंडे यांच्यासाठी माघार घेतली असून, त्यांनी सर्व ताकद मुंडेंच्या पाठीशी लावणार आहेत.