आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पवारांकडून अण्णांची खिल्ली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे व त्यांच्या सहका-यांनी राजकारणात उतरण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वागत केले. त्यातून आपल्यालाही काही शिकायला मिळेल, असे सांगत पवार यांनी त्यांची खास आपल्या शैलीत चांगलीच खिल्ली उडवली.
दिल्लीमधील काही संघटना नसते उद्योग करत असतात. या वेळी त्यांना एक चेहरा मिळाला आणि त्यांनी सत्ताधारी पक्षालाच घेरण्याचा प्रयत्न केल्याचा टोला पवारांनी लगावला. लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून त्या वेळी टीम अण्णांना समर्थन देणा-या भाजपचीही आता कशी फजिती झाली आहे, असे पवारांनी या वेळी सांगितले. मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते.
प्रतिनिधित्व नसलेल्या मतदारसंघांना निधी - आमदारांच्या निधीतील काही भाग राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व नसलेल्या भागांमध्ये खर्च करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे त्या भागातील कार्यकर्ते टिकून राहू शकतील. मात्र काही मंत्र्यांनी हा निधी स्वत:च्याच मतदारसंघामध्ये खर्च करून टाकल्याने आमदारांकडून काय अपेक्षा करणार, असेही ते म्हणाले.