आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pawar Takes Resignation Of His Parties Ministers

शरद पवारांनी घेतले राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे, प्रदेशाध्यक्षही बदलणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे केंद्रीय कृषीमंत्री व पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतले असल्याचे वृत्त शुक्रवारी सायंकाळी उशिरा धडकले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही बदलले जाणार असल्याचे कळते. येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

याबाबत सांगितले जात आहे की, राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ मंत्र्यांकडील जबाबदारी काढून त्याजागी तरुण नेतृत्त्व उभारण्याचा पवार यांचा विचार आहे. तसेच या वरिष्ठ नेत्यांना लोकसभेत पाठविण्याचा विचार आहे. त्यासाठी या नेत्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी करायला वेळ मिळावा यासाठी पवारांनी नवे डावपेच आखायला सुरुवात केली आहे. याचबरोबर प्रतिमा डागाळलेल्या व भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या चार-पाच मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, असे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या मंत्रिमंडळात काही बदल करु इच्छित असून काँग्रेसच्याही काही मंत्र्यांना वगळून नव्या चेह-यांना संधी दिली जाणार आहे.