आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pay Rs 10L To RTI Activist Arun Sawant Injured In Attack

निष्काळजी पोलिसांना चपराक, कार्यकर्त्याला दहा लाखांची भरपाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण सावंत यांनी जिवाला धोका असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले नाही. या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर गोळीबार झाला. यात गंभीर जखमी झाल्याने ते कायमचे अंथरुणाला खिळले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य मानवाधिकार आयोगाने सावंत यांना दहा लाख रुपये देण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. सावंत यांच्यावर २०१० मध्ये हल्ला झाला होता. सहा वर्षांनंतर त्यांना आयोगाने न्याय मिळवून दिला आहे.

गेल्या चार वर्षांपासून अध्यक्षपद रिक्त असलेल्या राज्य मानवाधिकार अायाेगाची धुरा अाता केरळचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एस. आर. बेन्नुरमठ यांच्याकडे अाहे. एका वर्षात राज्य आयोगाने सन २०१२-१३ ची शेकडो प्रकरणे हातावेगळी केली असून, जवळजवळ २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली असल्याची माहिती बेन्नुरमठ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या ठाण्यातील अरुण सावंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर गेली पाच वर्षे ते मानवाधिकार आयोगाकडे दाद मागत होते. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा स्पष्ट ठपका आयोगाने ठेवून दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गृह विभागाला पत्र लिहून सामाजिक कार्यकर्त्यांना वेळेवर पुरेसे संरक्षण देण्याचे निर्देश पोलिस स्टेशनला द्यावेत, असा आदेशही दिला आहे.