आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

paytm अकाऊंटमधून 32,433 रुपयांची चोरी, असे ठेवा पैसे सुरक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर पेटीएमसह इतर ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे पेटीएमची दर दिवसाची उलाढाल चक्क 120 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र नालासोपाऱ्यात घडलेल्या घडनेने ऑनलाईन पेमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एका व्यक्तीच्या पेटीएम अकाऊंटमधून तब्बल 32,433 कोटी रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
नालासोपारा येथील तुळींजमध्ये राहणारे राजकुमार सोनी यांचा बॅंक अकाऊंट नंबर कुणी तरी चोरला. त्यानंतर त्यांचे पेटीएम खाते चोरले. या अकाऊंटच्या माध्यमातून तब्बल 32,433 रुपये चोरले. सुरवातीला 5 हजार, नंतर 16999 आणि अखेर 10434 एवढी रक्कम काढली.
राजकुमार सोनी यांचा मुलगा सुरज याने बॅंकेत तक्रार दिली. त्यानंतर सोनी यांचे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. अन्यथा आणखी रक्कम चोरीला गेली असती. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा.... असे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित... असे ठेवा अॅप सुरक्षित....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...