आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनंतर वर्षात मंजूर होणार पेन्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवृत्तिवेतनासाठीचे अर्ज व पेन्शन मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, पेन्शन मंजुरीसाठी वर्षापेक्षा अधिक कालावधी लागणार नाही. कार्मिक मंत्रालयाच्या पत्रकानुसार पेन्शन नियमांतर्गत भराव्या लागणार्‍या जवळपास 26 अर्जांचा फेरआढावा घेऊन आवश्यक ते बदल केलेले अर्ज www.persmin.nic.in. या साइटवर टाकण्यात आले आहेत. निवृत्तिवेतन थकबाकी, पीएफ आणि रूपांतरणासंबंधी दाखल नामनिर्देशनांचा निपटारा होण्यासाठी सरकारचे निर्देश आहेत. नव्या बदलांत कर्मचार्‍याला सेवाकाळात एकच नामनिर्देशन अर्ज भरावा लागेल. दुसरा निवृत्तीच्या वेळी द्यावा लागेल. ‘भविष्य’ ही सक्षम यंत्रणा सध्या 15 मंत्रालयाअंतर्गत कार्यान्वित असल्याने पेन्शन प्रस्ताव नेमका कोणत्या टप्प्यात आहे, हेदेखील कळू शकणार आहे.