आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेंटाग्राफ दुरूस्तीनंतर अंबरनाथ, कल्याणमधील रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबरनाथ स्टेशनवर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. - Divya Marathi
अंबरनाथ स्टेशनवर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबई- पेंटाग्राफ दुरूस्तीनंतर अंबरनाथ, कल्याणमधील रेल्वेची वाहतूक संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पूर्वपदावर आली आहे. अंबरनाथ स्टेशनवर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. अप मार्गावरील सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. पेंटाग्राफ पडल्याने एक प्रवासी जखमी झाला आहे. 
 

या घटनेनंतर अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अंबरनाथ रेल्वे स्थानकात दुपारी 2.56 वाजता येणारी कर्जत-सीएसएमटी फास्ट लोकल रेल्वे स्थानकात शिरताच ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे या लोकलचा पेंटाग्राफ  तुटला. यामुळे अप लाईनचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. त्यामुळे कर्जतहून कल्याणकडे जाणारी रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली.

पेंटाग्राफ तुटल्यावर त्याचे तुकडे पार्सलच्या डब्यात दरवाज्यात बसलेल्या कमलेश जादवानी यांच्या पायात घुसले, त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली.

बातम्या आणखी आहेत...