आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Need Strong, Decisive And Result Oriented Leaders: Sharad Pawar

नेतृत्त्व दुबळे असले की झोळीवाला वर्ग तयार होतो, पवारांचा काँग्रेसला सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष यांनी उत्तरेकडील चार राज्यात काँग्रेसच्या झालेल्या पराभवाबाबत विश्लेषण करीत काँग्रेस पक्षाला डोस पाजला आहे. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी 50 वर्षाच्या राजकीय अनुभवाचे धडे दिले आहेत. हे धडे सर्व राजकीय पक्षांना लागू होत असून, त्यांनी काँग्रेसपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना या पराभवाबाबत गाभीर्याने विचार करा, असा सल्ला दिला आहे.
पवारांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, दिल्लीसह चार राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांत काँग्रेस पक्षाला जो फटका बसला आहे, त्याचा गांभीर्याने विचार काँग्रेससह आम्हा सर्वांनाच करावा लागणार आहे. या पराभवात नव्या पिढीचे मोठे योगदान असून या पिढीचा राग मतदानातून व्यक्त झाला आहे. राज्यकर्ता हा खंबीर आणि प्रभावी उपाययोजना करणारा, निर्णयाची खंबीरपणे अंमलबजावणी करणारा असला पाहिजे. घेतलेल्या निर्णयांची खंबीर अंमलबजावणी करण्याची कुवत त्याच्यामध्ये असली पाहिजे. जनतेला दुबळे राज्यकर्ते आवडत नाहीत.
जनहिताचे निर्णय घेऊन ते राबवण्याची शक्ती राज्यकर्त्यांमध्ये लोकांना दिसली पाहिजे. तसे दिसले नाही तर इतर शक्ती डोके वर काढतात. हाच धडा या निवडणुकांनी आम्हा सर्वांना दिला आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे उदाहरण येथे देता येईल. बँकांचे राष्ट्रीयीकरण असो, अथवा संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचा निर्णय असो, गरीबांचे हीत डोळ्यांसमोर ठेवून इंदिराजींनी हे निर्णय घेऊन राबवले आणि देशातला गरीब काँग्रेस पक्षाशी जोडला गेला. इंदिराजी असे निर्णय घेऊन धडाडीने राबवत. त्यामुळे त्यांच्या काळात 'झोळ्या' घेऊन मुफ्त सल्ला देणार्‍यांचा वर्ग तयार झाला नव्हता, जो अलिकडच्या काळात झालेला आपल्याला दिसतो. हा वर्ग अलिकडे इतका फोफावला आहे की जमिनीचं कसलंही नातं नसलेल्या नवनवीन कल्पना मांडत सुटतो. माध्यमेच नव्हे, तर सरकारमधील लोकही त्याला बळी पडतात. हा वर्ग व्यक्त करीत असलेली मते ही जनतेची आहेत, असा भ्रम त्यांच्यात निर्माण होतो, या सार्‍याचाच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, असेही पवारांनी म्हटले आहे.
पुढे वाचा, शरद पवारांनी केलेले आणखी विश्लेषणाचे मुद्दे
मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये चांगले काम म्हणूनच यश...
झोळीवाल्यांच्या नव्या फौजा मांडताहेत अवास्तव कल्पना, पण वास्तव निराळेच...
दिल्लीकर लाडावलेले, घेतात दुहेरी लाभ...