आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Of Nation Never Forget 2002 Gujrat Riots Pawar Critics On Modi

गुजरातमधील नरसंहार लोक विसरणार नाहीत- \'दुतोंडी\' पवारांची मोदींवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सध्या काही लोक विकासाच्या गप्पागोष्टी करीत आहेत. पण 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेला नरसंहार लोक अद्याप विसरलेले नाहीत व विसरणारही नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. काही दिवसापूर्वीच नरेंद्र मोदींना भेटण्यात गैर काय आहे, असा सवाल करणा-या शरद पवारांची यामुळे दुतोंडी भूमिका समोर आली आहे.
देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबूल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत आज पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला पवार उपस्थित होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
पवार म्हणाले, आज देशातले वातावरण बदलवण्याच्या कामी काही लोक लागले आहेत. मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही. पण मीडियाही त्यांच्या बाजूने आहे. टीव्ही चालू करा, त्यावर दाखवले जाते... गुजरातमध्ये हे होत आहे, ते होत आहे. देशातही तेच झाले पाहिजे. ठीक आहे, गुजरातचा विकास झाला. त्याबद्दल आम्हाला दुःख नाही. पण गुजरातची दुसरी बाजूही आम्ही पाहिली आहे. लोकांच्या सामूहिक कत्तली झाल्या हे सुद्धा देशवासीयांना माहीत आहे. या जुन्या गोष्टी आम्ही आठवू इच्छित नाही आणि बोलूही इच्छित नाही. पण कुणी देशाची सत्ता मागत असेल आणि सत्ता आल्यावर एका विशिष्ट वर्गाचे हित आम्ही साधणार नाही, तसेच त्या विशिष्ट वर्गाला देशाच्या बाहेर जावे लागेल, अशी सक्ती करत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. माझ्या राजकीय कारकीर्दीत मी अशी सक्ती सहन केलेली नाही, असे पवार यांनी सांगितले.
पुढे वाचा, राष्ट्रवादीचे खाण्याचे आणि दाखविण्याचे दात वेगवेगळे...