आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी मंत्री बनण्यासाठी सोडले होते मुंबई पोलिस दलातील पद; या 5 बाबींमुळे राहिले चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- मोदी सरकारमध्ये डॉ. सत्यपाल सिंह यांच्याकडे मंत्रीपद सोपविण्यात आले आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून सत्यपाल सिंग यांची कारकीर्द चांगलीच गाजली. ती त्यांच्या तत्कालीन गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे. आपला अवमान करणाऱ्या सिंह यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडेही केली होती. त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सिंग यांनी नंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी 2014 मध्ये उत्तर प्रदेशातील बागपत मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली व ते खासदार झाले.
 
बागवे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती सिंह हेच माध्यमांना पुरवत असल्याचा आरोपही बागवे यांनी केला होता. बागवे यांच्याविरोधात 16 गुन्हे दाखल असल्याने त्यांना पासपोर्ट नाकारण्यात आल्याचा आरोपही त्यावेळी त्याच्यांवर लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांची मुंबईत पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली होती. तरुणांमध्ये दहशतवादविरोधात जागृतीसाठी त्यांनी मिशन ऑपरेशन मृत्यूंजय राबविले होते. 
 
पुढील स्लाईडवर पाहा सत्यपाल सिंह यांचे फोटो आणि माहिती 
बातम्या आणखी आहेत...