मुंबई- तेराव्या मुंबई मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील उत्तम धावपटूंसह सर्वसामान्य मुंबईकर, सेलिब्रिटी, उद्योजक यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. राज्यपाल विद्यासागर राव, मंत्री सुभाष देसाई, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह कॅटरिना कैफ, जॉन अब्राहम अनेक सेलिब्रिटी उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. दरम्यान, मुख्य मॅरेथॉन स्पर्धा नितेंद्रसिंग रावतने जिंकली आहे. भारतीय गटातही तो विजेता ठरला आहे. ललिता बाबरने रौप्यपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय गटात गिगियन किपकेटर अव्वल ठरला आहे.
मुंबई मॅरेथॉनच्या 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीला वरळी डेअरी येथून सकाळी 5.40 ला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून मॅरेथॉनच्या वेगवेगळ्या गटांच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. हाफ मॅरेथॉनवर दोन मराठमोळ्या धावपटूंनी आपले नाव कोरले. महिलांच्या गटात मोनिका राऊत अव्वल ठरली. मनिषा साळुंखेने दुसरा तर मोनिका आथरेने तिसरा क्रमांक पटकावला. पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये दिपक कुमारने विजय नोंदवला. त्याने 1 तास 6 मिनिटे आणि एका सेकंदात ही स्पर्धा जिंकली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मुंबई मॅरेथॉनचे उत्साही फोटो....