आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Republican Party Of India News In Marathi

आघाडीतील घोळाचा कवाडे गटाला फटका, पीपल्स रिपाइंची अस्वस्थता वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादीच्याआघाडीतील जागावाटपाच्या घोळाचा जोरदार फटका काँग्रेसचा नव्याने मित्रपक्ष बनलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) या आंबेडकरी पक्षाला बसला आहे. काँग्रेस पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार याचा निर्णय होत नाही. त्यामुळे प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाचे भविष्य मात्र टांगणीला लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. जोेद्र कवाडे यांनी एकही जागा मागता काँग्रेसला पाठिंबा ला होता. त्याचा मोबदला म्हणून प्रा. कवाडे यांना धान परिषदेवर घेऊन काँग्रेसने ऋण फेडले. आगामी धानसभेला काँग्रेसबरोबर एकही दलित गट नाही. त्यामुळे कवाडे यांचा काँग्रेसला दाखवण्यापुरता तरी उपयोग होऊ शकतो. प्रा. कवाडे यांनी आगामी धानसभेला काँग्रेसकडे २४ जागांची मागणी केली आहे. अर्थात, कवाडे यांची मागणी पत्रकार परिषदेतील आहे. प्रत्यक्षात बोलणी करण्यास बसल्यानंतर कवाडे गटाची एक-दोन जागांवर बोळवण होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागावाटपांचा तिढा काही सुटत नाही. त्यामुळे कवाडे यांच्याशी काँग्रेसचे नेते काहीही बोलण्यास तयार नाहीत. भारिप नेते अॅड. प्रकाश आंबेडकर कोणाशी युती करणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही. भारिप किंवा समाजवादी यांची काँग्रेसबरोबर युती झाल्यास कवाडे गटाच्या हाती फार काही लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रा. जोगेंद्र कवाडे यांची सध्या चांगलीच घालमेल होत असल्याचे सत आहे.