आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी सातपासूनच रांगा; टपाल खात्याच्या मुंबईतील मुख्यालयात गैरसोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बंदी घातलेल्या पाचशे, हजारच्या नोटा बदलून देण्याची साेय टपाल कार्यालयातही केली हाेती. मुंबईतील ‘जीपीओ’ कार्यालयाबाहेर सकाळी सातपासूनच ग्राहकांनी रांगा लावल्या हाेत्या, मात्र दुपारी एकनंतर पैशांचे वाटप करण्यात अाले. तसेच या ठिकाणी केवळ दोन हजारांच्या नोटा दिल्या जात हाेत्या. त्यामुळे अनेकांची गैरसाेय झाली.

टपाल खात्याचे महाराष्ट्र व गाेवा विभागाचे मुख्यालय (जीपीओ) ‘सीएसटी’समोरील एेतिहासिक वास्तूत आहे. या इमारतीसमाेर सकाळी सातपासूनच रांगा लागल्या हाेत्या. सकाळी दहा वाजता सुमारे ५०० लाेकांची रांग हाेती, असे रात्रपाळीवर तैनात असलेल्या पोलिसांनी सांगितले. मात्र, या इमारतीपासून अवघ्या १ किमी अंतरावर असलेल्या रिझर्व्ह बँकेतून ‘जीपीओ’त नोटा येण्यास दुपारचे दोन वाजले. ताेपर्यंत ग्राहक ताटकळत उभे राहिले. आरबीआयकडून एकूण ४ कोटी रुपये ‘जीपीओ’ला देण्यात अाले, मात्र या सर्व नोटा केवळ दोन हजारांच्याच हाेत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पैसे वाटताना माेठी पंचाईत झाली. चलन बदलीसाठी केवळ ४ हजारांची मर्यादा असल्याने २ हजारांच्या दोन नोटा घेऊन आता त्या चालवायच्या कशा, असा प्रश्न ग्राहकांना पडला हाेता. यापैकी कुणालाही १००, ५० वा १० च्या नोटा मिळाल्या नाहीत. ज्यांच्याकडे केवळ ५०० च्या दोन नोटाच होत्या त्यांना तर परत माघारी फिरावे लागले. या कार्यालयाने फाॅर्म वितरण आणि त्याची पडताळणीची उत्तम व्यवस्था केली होती. याशिवाय नोट बदलीसाठी ५ काउंटरही सुरू केले हाेते.

राज्यात एकूण १२ हजार ६०१ टपाल कार्यालये असून त्यातील ५९ मुख्य वा जीपीओ कार्यालये आणि २०५२ उप टपाल कार्यालये यांच्यात १० हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची साेय केली आहे. उर्वरित १० हजार ६४४ टपाल कार्यालयात ५ हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मुभा या कार्यालयांमध्ये बचत खाते असणाऱ्यांसाठी करण्यात अाली हाेती, असे राज्याचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी सांगितले. नवे खाते उघडताना जुन्या नोटा स्वीकारणार नाही, अशी सूचना लालबाग येथील टपाल कार्यालयात लावली हाेती. त्याकडे लक्ष वेधले असता ‘हे चुकीचे आहे,’ असे सांगत अग्रवाल यांनी जुन्या नोटा स्वीकारण्याच्या सूचना फाेनवर संबंधित कार्यालयाला दिल्या.
बातम्या आणखी आहेत...