आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीपल्स’प्रकरणी आठवलेंना चपराक, त्यांच्या गटाच्या विश्वस्तांना संस्थेत प्रवेश बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे खरे विश्वस्त कोण याबाबत मार्गदर्शन करावे, या पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवर येथील दिवाणी न्यायालयात शनिवारी सुनावणी झाली. संस्थेत आम्हाला प्रवेश मिळावा ही आठवले गटांच्या विश्वस्तांची मागणी या वेळी महानगर दंडाधिकाºयांनी अमान्य केली. या निकालामुळे आठवले गटाला चपराक मिळाल्याचे मानले जात आहे.
अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2012 मध्ये रामदास आठवले संस्थेचे अध्यक्ष झाले. मात्र, आठवलेंचे अध्यक्षपद बेकायदा असल्याचे आंबेडकर गटाचे म्हणणे होते. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी (24) संस्थेचा ताबा घेतला. त्यामुळे संस्थेचे खरे विश्वस्त कोण याबाबत पोलिसांत संभ्रम
निर्माण झाला होता.
तसेच दोन्ही गटांच्या हक्कामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पीपल्सचे खरे विश्वस्त कोण, याबाबतच्या मार्गदर्शनासाठी पोलिसांनी याचिका दाखल केली. सुनावणीवेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालय आवारात गर्दी केली होती. पुढील सुनावणी 15 जुलै रोजी आहे. दोन्ही गट त्यात आपापले म्हणणे मांडतील. रामदास आठवले, कृष्णा पाटील, डी.जे. गांगुर्डे यांना संस्थेत प्रवेश करण्यास न्यायालयाने मनाई केली असून आमचे विश्वस्त कायदेशीर ठरले आहेत, अशी प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.पोलिसांचा वेढा
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय असणा-या आनंद भवन इमारतीमध्ये संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. दोन्ही गटांतील संघर्षामुळे या इमारतीला पोलिसांचा दिवसरात्र वेढा आहे. मात्र, विद्यार्थ्यांना सुरक्षेचा नाहक त्रास भोगावा लागत आहे.

बँक कर्मचारी वैतागले
पीपल्सच्या इमारतीमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रदेश कार्यालय आहे. दोन्ही गटांतील मारामारी आणि इमारतीला पडणारा पोलिस वेढा याला बँक कर्मचारीही वैतागले आहेत. त्यामुळे कार्यालयाचे स्थलांतर करावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने बँक व्यवस्थापनाकडे केली आहे.