आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीपल्स’चे अध्यक्षपद रामदास आठवलेंकडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 मध्ये स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची सूत्रे लवकरच रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे येतील. आमदार प्रीतमकुमार शेगावकर यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर आठवले यांची महिन्यापूर्वी अध्यक्षपदी निवड झाली होती; परंतु त्यांनी अधिकृतपणे सूत्रे स्वीकारली नव्हती. पीपल्सची मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि गया येथे महाविद्यालये आहेत. संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी भारिप-बमसंचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि आठवले यांच्यात गेली अनेक वर्षे संघर्ष सुरू आहे. 1 जून रोजी आंबेडकर यांनी पीपल्सचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना संस्थेत प्रवेश करण्यास रोखण्यात आले होते. तेव्हा दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री होऊन 50 कार्यकर्ते जखमी झाले होते.