आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसर्‍या आठवड्यातही मोनोला प्रचंड प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-' देशातील पहिल्या मोनो रेलचे कौतुक कमी झाले नसून केवळ मोनोचा आनंद घेण्यासाठी प्रवासी मोठय़ा संख्येने वडाळा आणि चेंबूर येथे गर्दी करत आहेत. दुसर्‍या आठवड्यातही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मोनोला मिळाल्याने तिकीट विक्रीतून जवळजवळ 27 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
8 ते 15 फेब्रुवारीदरम्यान वडाळा-चेंबूर मार्गावर एक लाख 42 हजार 410 प्रवाशांनी मोनो रेलच्या सेवेचा लाभ घेतला आहे. या आठवड्यात मोनो रेलच्या एकूण 521 फेर्‍या झाल्या असून दोन लाख 73 हजार 898 तिकिटांच्या विक्रीतून 27 लाख 95 हजार 115 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. स्मार्ट कार्डला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.